गंगटोकची सफर
ऐनवेळी ठरलेल्या प्रवासाची तयारी
सतीश चा फोन आला तेंव्हा पावसाळ्या पूर्वी कुठे तरी जाऊया अशी चर्चा झाली पण कुठे जायचे नक्की ठरत नव्हते . मागच्या वर्षी केदारनाथ , त्या आधी बद्रीनाथ आणि त्या आधी इझमीर , कैरो , मालदिव असा एकत्र प्रवास केलेला होता . त्या मुळे या वर्षी सुद्धा कुठे तरी जाऊया यावर एकमत झाले. बरीच चर्चा झाल्यावर शेवटी एकदाचे गँगटोक ला ज्यु या असे ठरले . माझा नेहमीच एअर ट्रॅव्हल चा एजन्ट ठरलेला आहे तो पूर्वी दिल्ली मध्ये राहत होता . पँडेमिक दरम्यान सुखविंदर कुमार दिल्ली सोडून परत आपल्या गावी नैनिताल ला परत गेला . पण माझ्यासाठी तो अजूनही तिकीट काढून देतो , वेळ पडली तर वेब चेकिंग पण करतो . काही बदल असेल फ्लाईट उशिरा सुटणार असेल तर तो फोन करून तसे कळवतो .
सुखविंदर कुमार ने मग दोन तिकिटे केली. एक माझ्यासाठी मुंबई बागडोगरा- मुंबई आणि सतीश साठी मुंबई- बागडोगरा -पुणे व्हाया दिल्ली. सतीशचा जावई अभिनव हा लष्करात आहे. काही काळ त्याचे बागडोगरा जवळ पोस्टिंग होते , त्यामुळे त्याची त्या भागात ओळख आहे . बाग डोगराला पोहोचल्यानंतर तिथून गँगटोक पर्यंत जाण्यासाठी एक कार बुक केली. ऑनलाईन किंग्सटन नावाचे यागी ग्रुप चे हॉटेल बुक केलं आणि आमची जायची तयारी पूर्ण झाली.
गँगटोकला एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी नथूला पास या भारत चीन सीमेवरील बॉर्डर पोस्टला भेट द्यायची का असं सतीश ने विचारलं आणि मी म्हटलं ओके जाऊया. पण त्यासाठी गॅंगटोक ते नथूला आणि परत येण्यासाठी वाहनाची गरज होती तिथे जाण्यासाठी पास सुद्धा काढावा लागतो म्हणून मग मी हॉटेल ला फोन केला तिथल्या रिसेप्शनिस्ट शी बोललो नथुला पास आणि जाण्यासाठी वाहन मिळेल का आणि पास काढून मिळेल का याची चौकशी केली ती म्हणाली होऊ शकतं फक्त तुमचं आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज चा फोटो पाठवून द्या मग तिने दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर मी माझा फोटो आणि आधार कार्ड पाठवून दिले. सतीश कडून फोटो आणि आधार कार्ड मागवले आणि तेही पाठवून दिले आणि नथूला पास जाण्याची तयारी पण पूर्ण झाली.
(अपूर्ण )
No comments:
Post a Comment